मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

ग्रीन टी चे फायदे | Benefits of Green tea in Marathi

ग्रीन टी हे जगातील पोषक पेयांपैकी एक आहे, ज्यामध्ये विविध पोषक तत्वांचा समावेश असतो. ग्रीन टी मधील पोषक्तात्वांमुळे आपल्या शरीराला दैनंदिन जीवनात खूप फायदे होत असतात. या लेखात आपण ग्रीन टी म्हणजे काय, ग्रीन टी चे फायदे, ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ अशा विविध घटकांची माहिती पाहणार आहोत. ग्रीन टी म्हणजे काय ? Camellia sinensis नावाच्या झाडाच्या पानांपासून आणि कळ्यांपासून ग्रीन टी चे उत्पादन घेतले जाते. ग्रीन टी हा चहाचा एक प्रकार असला तरी, इतर चहा बनविण्यासाठी ज्या प्रमाणे ऑक्सिडेशन ची प्रक्रिया पार पाडावी लागते, तशी प्रक्रिया ग्रीन टी तयार करण्यासाठी पार पाडावी लागत नाही. ग्रीन टी ची उत्पत्ती ही जगात सर्वप्रथम चीन या देशात झाली असून, चीन हा जगातील ग्रीन टी चा सर्वाधिक उत्पादन घेणारा देश आहे. कालांतराने ग्रीन टी चे प्रसारण संपूर्ण जगात झाले असल्यामुळे, जगात जवळ जवळ सर्वाच देशांमध्ये ग्रीन टी चे उत्पादन घेतले जात आहे. ग्रीन टी चे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या देशांच्या यादीत भारताचे नाव देखील सामील आहे. ग्रीन टी चे फायदे ( Benefits Of Green tea in Marathi ) 1. कॅन्सर पासून बचाव होतो कॅन्सर हा

वजन कमी करण्यासाठी काय खावे ?

वजन कमी करण्यासाठी न केवळ व्यायाम, तर योग्य आहाराची देखील गरज असते. अनेक लोक वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतात, परंतु त्यांना परिणाम काही दिसून येत नाही, याची दोन महत्त्वाची कारणे म्हणजे, एक तर ते व्यायाम करत नसतील किंवा योग्य खाद्य पदार्थ खात नसतील.

वजन कमी करण्यासाठी योग्य आहाराची गरज असते, हे तर माहीत झाले, परंतु नेमके खायचे तरी काय हा मोठा प्रश्न उभा राहतो.

या लेखात आपण वजन कमी करण्यासाठी काय खावे या प्रश्नाचे निराकरण करत काही खाद्यपदार्थ आणि त्यांच्या पोषणाची माहिती पाहणार आहोत.

1. काकडी

काकडी हा आपल्या दैनंदिन जीवनात वापरला जाणारा खाद्यपदार्थ आहे. काकडीला Super Food म्हणून देखील ओळखली जाते. काकडीच्या पोषणात 90% टक्के पेक्षा अधिक पाण्याचा समावेश असतो, त्यामुळे त्यात कॅलरीज देखील फार कमी आढळतात. या खाद्यपदार्थाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे काकडीला खाण्यासाठी काही प्रक्रिया कराव्या लागत नाहीत, म्हणजे फक्त कापायची आणि खायची, यामध्ये पाणी अधिक प्रमाणात असल्यामुळे काकडी खाल्ल्याने शरीरात पाण्याची गरज भासत नाही, म्हणजेच शरीर Hydrate राहते.

काकडी पचनास हलकी असल्यामुळे पचनशक्ती सुरळीत होण्यासाठी देखील फार मदत होते. वजन कमी होणे, आहाराला पौष्टिक बनवणे, असे अनेक फायदे नियमित काकडी खाल्ल्याने होतात.

100 ग्रॅम काकडीचे पोषण

 • Calories: 16
 • Carbohydrates: 3.6 Gm
 • Fiber: 0.5 Gm
 • Protein: 0.6 Gm
 • Fat: 0.1 Gm
 • Water: 95 Gm
 • Calcium: 16 Mg
 • Iron: 0.2 Mg
 • Vitamin c: 2.8 Mg

2. सोयाबीन

सोयाबीन पासून विविध प्रकारचे Dairy Products तयार केले जातात, जसे की दूध, दही आणि टोफू. टोफू हे काहीसे पनीर प्रमाणे असते, जे सोयाबीनच्या दुधापासून तयार करतात, हे सर्व पदार्थ वजन कमी करण्यासाठी फार उत्तम मानले जातात.

सोयाबीनमध्ये प्रथिने अधिक प्रमाणात असल्यामुळे अनेकदा याचा उपयोग Muscle Building किंवा Body Building साठी देखील केला जातो. 

दर दिवशी आपल्या शरीराला आपल्या वजनाइतक्या प्रोटीन गरज भासत असते, ही शारीरिक गरज सोयाबीन मार्फत अगदी सहज पूर्ण होऊ शकते. 

सोयाबीनमध्ये न केवळ प्रथिने तर इतर शरिराला आवश्यक असणारे पोषक तत्वे देखील मुबलक प्रमाणात असतात. नियमित मर्यादित सोयाबीनचे सेवन केल्याने कॅन्सर सारख्या रोगापासून देखील आपल्याला शरीराचा बचाव होऊ शकतो. तसेच वजन कमी होणे, दैनंदिन जीवनातील शरीराची प्रथिनांची गरज भागणे, हाडांची मजबुती टिकून राहणे असे अनेक फायदे होतात.

100 ग्रॅम सोयाबिन चे पोषण

 • Calories: 446
 • Fat: 20 Gm
 • Fiber: 9.3 Gm
 • Protein: 37 Gm
 • Omega-3: 1.33 Gm
 • Vitamin C: 6 Gm
 • Calcium: 277 Gm
 • Iron: 15 Mg
 • Water: 8.5 Gm
 • Cholesterol: 0

3. Egg White

अंड्यामध्ये एकूण सफेद आणि पिवळा असे दोन भाग असतात. त्यातील अंड्याच्या सफेद भागाला इंग्रजीत Egg White असे म्हणतात. वजन कमी करण्यासाठी किंवा व्यायामानंतर आहारासाठी Egg White हा एक खूप उत्तम पर्याय मानला जातो, कारण यामध्ये कॅलरीज कमी आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते आणि या दोन्ही गोष्टी वजन कमी करण्यासाठी महत्त्वाच्या असतात. 

Egg White च्या पोषणात एकूण 90% टक्के पाण्याचा समावेश असतो. Egg white कच्चे आणि उकळून अशा दोन्ही पद्धतीने आपण खाऊ शकतो, हे न केवळ पोषणात उच्च असते, तर चवीला देखील उत्तम असते.

100 ग्रॅम Egg White चे पोषण

 • Calories: 52
 • Fat: 0.2 Gm
 • Protein: 11 Gm
 • Carbohydrates: 0.7 Gm
 • Fiber: 0
 • Potassium: 163 Mg

4. पालक

पालक एक हिरवी पालेभाजी असूनही पोषणात देखील उच्च आहे. यामध्ये शरीरावश्‍यक विविध पोषक तत्वांचा समावेश असतो, तसेच आपण दैनंदिन जीवनात त्याचा वापर करत असतो ज्यामुळे पालक सहज उपलब्ध होते.

नियमित स्वरूपाने पालकचे सेवन केल्याने न केवळ वजन कमी होते, तर डोळ्यांचे आरोग्य चांगले राहणे, कॅन्सरपासून बचाव होने, रक्तदाब सुरळीत चालणे, मुतखड्या पासून सुटका मिळणे असे अनेक फायदे होत असतात. जितकी पालक फ्रेश असते तितकी आपल्यासाठी फायदेशीर असते. पालक पासून आपल्याला विविध प्रकारच्या डिश तयार करता येतात, परंतु जितके आपण पालक कच्चे खाऊ तितका जास्त फायदा आपल्या शरीराला होतो, कारण जेव्हा आपण भाजी उकळतो किंवा त्यात तेल मसाले ऍड करतो, तितके भाजीचे पोषण कमी होऊ लागते.

100 ग्रॅम पालक चे पोषण

 • Calories: 22
 • Fat: 0.4 Gm
 • Carbohydrates: 3.6 Gm
 • Protein: 2.9 Gm
 • Vitamin C: 28 Mg
 • Calcium: 99 Mg
 • Iron: 2.7 Mg
 • Water: 91.4 Gm

5. दही

दही हा दुधापासून तयार केला जाणारा खाद्यपदार्थ असून हे पेस्टच्या स्वरूपात असते. दही हे दुधापासून बनत असल्यामुळे, यामध्ये दुधाचे जवळजवळ सर्व पोषक तत्वे असतात. दह्याची खासियत म्हणजे आपण, दही घरी अगदी कमी खर्चात बनवू शकतो.

 दह्याची चव ही साधारणतः आंबट-गोड असते. दही मध्ये कॅल्शियम ह्या पोषकतत्वाचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे आपले दात आणि हाडे मजबूत राहतात, ज्यांनाही सांधेदुखीचा त्रास होतो अशा व्यक्तींना दही किंवा दूध उत्तम उपाय ठरू शकतो. 

भारतात कोणत्याही चांगल्या कामासाठी जाताना हातावर दही ठेवलं जाते, असे करणे शुभ असते असे म्हणतात, परंतु यामागील Scitific कारण काही वेगळेच आहे. Science नुसार दही खाल्ल्याने आपला मूड फ्रेश राहतो, त्यामुळे कोणतेही काम करताना उत्सुकता वाढते, सोबत शरीरात ऊर्जा नांदू लागते आणि आपले काम यशस्वी होण्याची संभाव्यता वाढते.

नियमित किमान एक वाटी दही खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढणे, वजन कमी होणे, पचन क्रिया सुरळीत राहणे, मन फ्रेश राहणे असे अनेक फायदे होत असतात.

100 ग्रॅम दहीचे पोषण

 • Calories: 69
 • Fat: 4.3 Gm
 • Protein: 11 Gm
 • Carbohydrates: 3.4 Gm
 • Calcium: 83 Mg
 • Water: 88%
 • Sugar: 4.7 Gm

6. फळे

वजन कमी करण्यासाठी संत्रा, कलिंगड, टरबूज, पपई, द्राक्ष, अननस, चिकू, सफरचंद असे अनेक फळे आपण खाऊ शकतो. फळांमध्ये नैसर्गिक गोडवा असल्यामुळे मधुमेहासारखे त्रास उद्भवत नाही, सोबतच एक चांगली चव देखील लाभते.

अनेकांना फळांचा रस करून पिणे आवडते, परंतु रस पेक्षा फळे खाणे अधिक लाभदायक ठरते. 

7. चिकन

चिकन जवळजवळ सर्वांच्याच आवडीचा खाद्यपदार्थ आहे. हा न केवळ भारतात तर संपूर्ण जगात अगदी आवडीने खाल्ला जाणारा खाद्यपदार्थ आहे. प्रत्येक ठिकाणी चिकन खाताना आपल्याला एक वेगळीच पण स्वादिष्ट अशी चव अनुभवायला मिळते.

चिकनला उत्तम Protein चा सोर्स म्हणून देखील ओळखली जाते आणि न केवळ प्रोटीन तर इतर पोषक तत्वांचा देखील पुरेसा साठा देखील चिकन मध्ये उपलब्ध असतो. वजन कमी करण्याऱ्या खाद्यपदार्थांच्या यादीत चिकन चा समावेश होतो, कारण यात वजन वाढणाऱ्या fat चे प्रमाण अगदी कमी आणि अधिक प्रोटीन असल्यामुळे आपले मेटाबोलिजम देखील वाढण्यास मदत मिळते.

ज्या लोकांच्या शरीरात उष्णता अधिक आहे किंवा त्यांना गजकरण आहे अशा लोकांनी चिकन खाने टाळाले पाहिजे, कारण चिकन मध्ये देखील भरपूर उष्णता असते, शरीरात जास्त उष्णता असणाऱ्या लोकांनी चिकन खाल्ले की गजकरण वाढणे, तोंडावर फोड येणे असे त्रास होण्याची दाट शक्यता असते.

100 ग्रॅम चिकन चे पोषण

 • Calories: 239
 • Protein: 27 Gm
 • Fat: 14 Gm
 • Fiber: 0
 • Carbohydrates: 0
 • Cholesterol: 88 Mg
 • Calcium: 15 Gm

8. बदाम

आपण संपूर्ण दिवसभरात तीन मुख्य आहार घेतो, त्यातील पहिला आहार म्हणजे न्याहरी, दुसरा म्हणजे दुपारचे जेवण आणि तिसरा म्हणजे रात्रीचे जेवण. हे तीन मुख्य आहार वगळता अधून मधून काही लहान-सहान खात असतो, जसे की आईस्क्रीम, चिप्स, कोल्ड्रिंक्स आणि अधिक. ज्यामुळे आपले वजन वाढते, वजन न वाढवता लहान लहान भूक भागवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे बदाम. बदाम न केवळ भूक भागवते, तर पोस्टीक देखील असते, तसेच मेंदूच्या कार्यप्रणालीसाठी देखील उत्तम मानले जाते.

बदामाच्या पोषणात फायबर, प्रोटीन, मॅग्नेशियम, आयरन, विटामिन अशा अनेक पोषक तत्वांचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो, यामुळे रक्तदाब सुरळीत राहणे, वजन कमी होणे, रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राहणे असे अनेक फायदे होतात. अनेक लोकांना बदामाची चव आवडत नाही, अशा लोकांसाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे बदामाचे दूध जे बाजारात अगदी सहज उपलब्ध होते.

100 ग्रॅम बदाम चे पोषण

 • Calories: 579
 • Carbohydrates: 21.6 Gm
 • Healthy Fat: 49.9 Gm
 • Fiber: 12.5 Gm
 • Protein: 21.2 Gm
 • Calcium: 264 Mg
 • Iron: 3.72 Mg
 • Water: 4.40 Gmटिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट