मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

ग्रीन टी चे फायदे | Benefits of Green tea in Marathi

ग्रीन टी हे जगातील पोषक पेयांपैकी एक आहे, ज्यामध्ये विविध पोषक तत्वांचा समावेश असतो. ग्रीन टी मधील पोषक्तात्वांमुळे आपल्या शरीराला दैनंदिन जीवनात खूप फायदे होत असतात. या लेखात आपण ग्रीन टी म्हणजे काय, ग्रीन टी चे फायदे, ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ अशा विविध घटकांची माहिती पाहणार आहोत. ग्रीन टी म्हणजे काय ? Camellia sinensis नावाच्या झाडाच्या पानांपासून आणि कळ्यांपासून ग्रीन टी चे उत्पादन घेतले जाते. ग्रीन टी हा चहाचा एक प्रकार असला तरी, इतर चहा बनविण्यासाठी ज्या प्रमाणे ऑक्सिडेशन ची प्रक्रिया पार पाडावी लागते, तशी प्रक्रिया ग्रीन टी तयार करण्यासाठी पार पाडावी लागत नाही. ग्रीन टी ची उत्पत्ती ही जगात सर्वप्रथम चीन या देशात झाली असून, चीन हा जगातील ग्रीन टी चा सर्वाधिक उत्पादन घेणारा देश आहे. कालांतराने ग्रीन टी चे प्रसारण संपूर्ण जगात झाले असल्यामुळे, जगात जवळ जवळ सर्वाच देशांमध्ये ग्रीन टी चे उत्पादन घेतले जात आहे. ग्रीन टी चे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या देशांच्या यादीत भारताचे नाव देखील सामील आहे. ग्रीन टी चे फायदे ( Benefits Of Green tea in Marathi ) 1. कॅन्सर पासून बचाव होतो कॅन्सर हा

वजन कमी करण्याचे उपाय | Vajan Kami Karnyache Upay

लठ्ठपणा हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील सर्वात कठीण काळ असतो. या दरम्यान आपल्याला अनेक शारीरिक आणि मानसिक त्रासाना सामोरे जावे लागते. एका जागतिक Report नुसार, जगातील एकूण लोकसंख्येपैकी जवळजवळ ३०% पेक्षा अधिक लोक लठ्ठपणाचा शिकार आहेत. लठ्ठ झाल्यावर आपले शरीर कमजोर होऊ लागते, ज्यामुळे आपल्याला विविध आजारांना तोंड देखील द्यावे लागते.

आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेक अशा लहान लहान चुका करत असतो, ज्यामुळे आपले वजन वाढते. अनेक लोक वजन कमी करण्यासाठी विविध औषधे घेतात, विविध उपाय करतात, परंतु त्याचा काहीच उपयोग होत नाही, कारण जोपर्यंत ते औषध खातात, तोपर्यंतच त्यांचे वजन नियंत्रित राहते, औषध बंद केले की पुन्हा वजन वाढू लागते, अशा प्रकारचे अनेक विविध उपाय सतत असफल ठरत असतात.

वजन कमी करणे हे एक सरळ, पण अवघड काम आहे, म्हणजे यावर उपाय तर सरळ आहेत, परंतु त्या उपायांवर अवलंब करणे अवघड आहे.

ह्या लेखात आपण वजन कमी करण्यासाठी उपाय पाहणार आहोत, जे पूर्णता नैसर्गिक, मोफत आणि परिणामकारक असतील.

वजन कसे वाढते ?

वजन कमी करण्याचे उपाय पाहण्या आधी, वजन कसे वाढते हे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे, कारण जेव्हा तुम्ही वजन वाढण्याची प्रक्रिया समजून घ्याल, तेव्हाच तुम्हाला वजन कमी करण्याची अथवा वजन कमी होण्याची प्रक्रिया समजून येईल आणि सोपी देखील वाटेल.

आपण दैनंदिन जे काही अन्न खातो अथवा पेय ( Drinks ) पितो, त्यामध्ये ऊर्जा म्हणजेच Energy असते आणि अन्नातील ही एनर्जी मोजण्यासाठी कॅलरी या युनिटचा उपयोग केला जातो.

दैनंदिन जीवनात आपल्याला ठराविक मापात ऊर्जेची म्हणजेच कॅलरीजची गरज असते, जर आपण गरजेपेक्षा अधिक कॅलरीज शरीराला पुरविल्या, तर त्यातील गरजे पुरती कॅलरीज शरीर वापरते आणि उर्वरीत कॅलरीज चरबी ( Fat ) स्वरूपी शरीरावर साठू लागते आणि सतत चालणार्‍या या प्रक्रियेमुळे आपले वजन वाढते. 

उदा. समजा की तुमच्या शरीराला दैनंदिन जीवनात २००० कॅलरीजची गरज भासते आणि तुम्ही अन्नातून तर दिवशी शरीराला २,५०० कॅलरीज पुरवत असाल, तर त्यातील २००० कॅलरी, तुमचे शरीर विविध कार्यांसाठी वापरले आणि उर्वरित ५०० कॅलरीज फॅट म्हणुन शरीरात जमा होऊ लागते.

७,७०० कॅलरीज म्हणजे एक किलो. दर दिवशी ५०० या हिशोबाने, तुम्ही एक आठवड्यात ३,५०० तर दोन आठवड्यात ७००० कॅलरीज गरजेपेक्षा जास्त खाता, म्हणजे तुम्ही जेव्हा ७७०० कॅलरीज जास्तीचे शरीराला पुरवठा, तेव्हा तुमचे एक किलो इतके वजन वाढते.

इथे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे दैनंदिन जीवनात आपल्याला किती कॅलरीजची गरज भासते हे कसे ओळखावे ?, तर यासाठी Calories Calculator नावाची एक वेबसाईट इंटरनेटवर आहे, जिथे तुम्हाला किंवा तुमच्या शरीराची थोडी माहिती द्यायची असते, ती दिल्यावर तुम्हाला किती कॅलरी दैनंदिन जीवनात लागतील ही माहिती तुम्हाला मिळते.

वजन वाढण्याची कारणे

इथे आपण वजन वाढण्याची काही साधी करणे पाहणार आहोत,

  • धूम्रपान 
  • तेलाचे पदार्थ जास्त खाणे
  • मद्यपान व धूम्रपान करणे
  • मैदायुक्त पदार्थ खाणे
  • व्यायाम न करणे  
  • अपचन होणे
  • घाईघाईने जेवण खाणे
  • शरीराची हालचाल कमी करणे 
  • जेवण झाल्यावर लगेच झोपी जाणे 
  • मांसाहार जास्त घेणे

वजन कमी करण्याचे उपाय

1. नियमित व्यायाम करणे.

व्यायाम म्हणजे आपल्या चांगल्या आरोग्याची चावी आहे. व्यायामाचे आपल्या जीवनात अनन्य साधारण असे महत्त्व आहे. व्यायाम करताना आपल्या शरीराची नेहमीपेक्षा जास्त हालचाल होते, ज्यामुळे शरीरातील जास्त कॅलरीज Burn होतात आणि वजन कमी मदत होते.

जास्त नव्हे तर केवळ दिवसातून २० ते २५ मिनिटे व्यायाम केल्याने आपण आपले वजन नियंत्रणात आणू शकतो. एका जागतिक रिपोर्टनुसार असे समोर आले आहे की, व्यायाम करणार्‍या व्यक्तीचा जीवनकाळ हा व्यायाम न करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनकाळापेक्षा जास्त असतो.

2. अन्न ३२ वेळा चाऊन खाणे.

जितके महत्त्वाचे अन्न आहे, तितकेच महत्त्वाचे अन्न खाण्याची क्रिया देखील आहे. हल्लीच्या धावपळीच्या जीवनात लोकांकडे स्वतःच्या शरीरासाठी वेळ नसतो, अनेक लोक तर जेवण देखील घाईघाईने करतात आणि हेच अनेकदा वजन वाढण्याचे मुख्य कारण बनते. कारण अन्नाचे पूर्ण पचन होत नाही आणि तसे न झाल्यास शरीराला पोषण मिळत नाही ज्यामुळे metabolism योग्य रित्या काम करत नाही आणि वजन वाढते.

अन्न 32 वेळा चावून खाणे ही एक चांगली सवय आहे. 32 वेळा अन्न चावले की तोंडातच अन्नाचे लहान लहान तुकडे होतात आणि हे अन्न जेव्हा पोटात जाते, तेव्हा पचन क्रियेला हे बारीक झालेले अन्न पचन करण्यास जास्त कष्ट लागत नाही, त्यामुळे अन्नातील संपूर्ण पोषण शरीराला मिळते, तसेच अन्न पचन क्रिया देखील सुरळीत होते, ज्यामुळे वजन कमी होते अथवा नियंत्रित राहते.

3. आहारात तेलकट आणि मैदायुक्त पदार्थांचा वापर कमी करणे.

हल्ली लोकांमध्ये Street Food चे आकर्षण अगदी वेगाने वाढत आहे. Street Food म्हणजे रस्त्या लगत असलेले उघड्यावरचे अन्न, जे दिसायला रंगीबेरंगी आणि स्वादिष्ट तर असतात, परंतु यामध्ये पोषण अगदी नसल्याप्रमाणेच असते.

असे अन्न वजन वाढण्याचे मुख्य कारण असते, कारण अशा खाद्य पदार्थांमध्ये मैद्याचा आणि तेलाचा अधिक वापर दिसून येतो, जे पचनास कठीण आणि जास्त फॅटवाले असतात, ज्यामुळे पचनशक्ती बिघडते आणि वजन वाढण्यास सुरुवात होते, तसेच यामध्ये कॅलरीजचे प्रमाण देखील इतर खाद्यपदार्थ पेक्षा अधिक आढळून येते, जर तुम्हाला तुमचे वजन नियंत्रित ठेवायचा असेल, तर असे पदार्थ खाद्यपदार्थ खाणे टाळा अथवा कमी करा.

4. मद्यपान आणि धूम्रपान यांचे सेवन टाळा.

ताण तणाव म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनू लागला आहे. आज प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा तणाव असतोच, ज्यामुळे लोक व्यसन करण्यास सुरुवात करतात.

मद्यपान आणि धूम्रपान यामध्ये काही रसायने असतात, जी आपल्या शरीरासाठी फार घातक असतात. व्यसन करत असताना हिच रसायने आपल्या शरीरात प्रवेश करतात, जी अनेकदा आपल्या शरीराचे Metabolism कमकुवत होण्यास कारणीभूत ठरतात, त्यामुळे आपले वजन वाढते तसेच आपल्या शरीर आतून कमजोर होऊ लागते, ज्यामुळे शक्य होईल तितके व्यसन करणे टाळा.

5. रात्री हलके जेवण करणे

अनेक लोकांना एक चुकीची सवय असते, ती म्हणजे रात्रीच्या वेळी पोटभर जेवण करणे. आता अनेक लोकांच्या मनात एक विचार येत असेल की रात्री पोटभर जेवण करणे ही चुकीची सवय कशी ? तर रात्री जेवल्यानंतर आपण 7 ते 8 तासांची झोप घेतो. या दरम्यान आपल्या शरीराची काहीच हालचाल होत नाही, यावेळी आपली फक्त पचनक्रिया कार्यरत असते. अशात जर आपण पोटभर जेवलो, तर अन्नाचे पूर्ण पचन होत नाही आणि मग पोट साफ न होणे, पोट दुखी असे त्रास सुरू होतात. जे कोठे ना कोठे वजन वाढण्यास देखील कारणीभूत ठरतात, यावर एक मात्र उपाय म्हणजे झोपण्यापूर्वी कमी जेवण करा किंवा दही,भात, काकडी, फळे अशी पचनास हलकी असलेली खाद्य पदार्थ खा.

6. प्रत्येक आहारानंतर 10 ते 15 मिनिटे चालणे

दिवसभरात सकाळ दुपार आणि रात्र असे आपण तीन मुख्य आहार घेतो. हे तीनही आहार आपल्या शरीराच्या पोषणासाठी फार महत्त्वाचे असतात. हे मोठे आहात घेतल्यानंतर किमान 10 ते 15 मिनिटे चालण्याची सवय अंगीकृत करून घेणे फार महत्त्वाचे आहे. कारण जेवल्यानंतर चालल्याने अन्नपचन वेगाने आणि सुरळीत होते त्यामुळे अन्नातील सर्व पोषण आपल्या शरीराला मिळते, यामुळे मेटाबोलिजम सुरळीत कार्यकर्ते आणि आपले वजन नियंत्रित राहते.

7. सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू पिळून पिणे.

वजन कमी करण्यासाठी बाजारात अनेक महागडे Fat Burner उपलब्ध आहेत, परंतु एक fat burner असे आहे, जे विनामूल्य आहे. तसेच ते आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने देखील तयार करू शकतो हे नैसर्गिक देखील आहे आणि परिणामकारक देखील ते म्हणजे कोमट लिंबू पाणी. लिंबू हे एक Citrus फळ आहे, जे चवीला आंबट असते. 

लिंबूला Vitamin C चे उत्तम स्त्रोत मानले जाते. लिंबामध्ये असा गुणधर्म असतो, जो शरीरातील अतिरिक्त Fat Cell's ब्रेक करतो आणि वजन कमी करण्यास मदत देखील करतो. जर वजन नैसर्गिकरीत्या कामी करायचे असेल तर सकाळी उठल्यावर उपाशी पोटी कोमट पाणी लिंबू पिण्यास सुरुवात करा.

8. जास्त पाणी पिणे.

आपले संपूर्ण शरीरात 70 टक्के पाण्याचा समावेश असतो, ज्यामुळे वेळोवेळी आपल्याला पाणी पिऊन शरीराला पाण्याचा पुरवठा करावा लागतो. पाणी पिल्याने आपल्या शरीराला दैनंदिन जीवनात अनेक फायदे होत असतात, जसे की शरीर Hydrate राहते. पचनक्रिया सुरळीत होते, वजन कमी होते आणि अधिक. त्यामुळे दिवसभरात जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करावा. थंड पाणी पिणे टाळावे, जमेल तितके साधे पाणी किंवा कोमट पाणी पिण्याचा प्रयत्न करावा.

निष्कर्ष

वजन कमी करणे, हे काही अवघड काम नाही. दैनंदिन जीवनात अगदी लहान लहान उपाय करून आपण अगदी सहज वजन कमी करू शकतो, फक्त ही एक वेळ घेणारी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये अनेक महिन्याचा कालावधी लागतो ज्यामुळे अनेक लोक अर्ध्यातूनच माघार घेतात, त्यामुळे त्यांना वजन कमी करणे थोडे अवघड वाटते.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट