मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

ग्रीन टी चे फायदे | Benefits of Green tea in Marathi

ग्रीन टी हे जगातील पोषक पेयांपैकी एक आहे, ज्यामध्ये विविध पोषक तत्वांचा समावेश असतो. ग्रीन टी मधील पोषक्तात्वांमुळे आपल्या शरीराला दैनंदिन जीवनात खूप फायदे होत असतात. या लेखात आपण ग्रीन टी म्हणजे काय, ग्रीन टी चे फायदे, ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ अशा विविध घटकांची माहिती पाहणार आहोत. ग्रीन टी म्हणजे काय ? Camellia sinensis नावाच्या झाडाच्या पानांपासून आणि कळ्यांपासून ग्रीन टी चे उत्पादन घेतले जाते. ग्रीन टी हा चहाचा एक प्रकार असला तरी, इतर चहा बनविण्यासाठी ज्या प्रमाणे ऑक्सिडेशन ची प्रक्रिया पार पाडावी लागते, तशी प्रक्रिया ग्रीन टी तयार करण्यासाठी पार पाडावी लागत नाही. ग्रीन टी ची उत्पत्ती ही जगात सर्वप्रथम चीन या देशात झाली असून, चीन हा जगातील ग्रीन टी चा सर्वाधिक उत्पादन घेणारा देश आहे. कालांतराने ग्रीन टी चे प्रसारण संपूर्ण जगात झाले असल्यामुळे, जगात जवळ जवळ सर्वाच देशांमध्ये ग्रीन टी चे उत्पादन घेतले जात आहे. ग्रीन टी चे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या देशांच्या यादीत भारताचे नाव देखील सामील आहे. ग्रीन टी चे फायदे ( Benefits Of Green tea in Marathi ) 1. कॅन्सर पासून बचाव होतो कॅन्सर हा

पोट कमी करण्यासाठी व्यायाम | Pot Kami Karnyasathi Vyayam

आपल्या लठ्ठपणाची सुरुवात ही पोटा पासूनच होते, म्हणजे आपण जेव्हा लठ्ठपणाच्या पहिल्या टप्प्यात असतो, तेव्हा प्रथम चरबीचा घेरा आपल्या पोटाभोवती तयार होऊ लागतो, ज्याला इंग्रजीत Stomach Fat किंवा Belly Fat असे म्हंटले जाते.

 पोटावरील चरबीचा घेरा तयार होताना तर वेळ घेत नाही, परंतु लवकर जातही नाही याचा विचार करता, या लेखात आपण पोट कमी करण्यासाठी व्यायाम पाहणार आहोत, जे लवकरात लवकर तुम्हाला पोटावरील चरबी कमी करण्यासाठी मदत करतील.

पोट कमी करण्यासाठी व्यायाम

1. क्रंचेस (Crunches)

क्रंचेस हा पोटाच्या व्यायामाचा सर्वात प्रसिद्ध आणि सोप्पा प्रकार आहे, जो आपण घरी आणि जिम या दोन्ही ठिकाणी कमी जागेत अगदी सहज करू शकतो. घरी आपण एकाच प्रकारचे व्यायाम सादर करू शकतो, तर जिममध्ये यासाठी विविध प्रकारचे उपकरणे देखील असतात, ज्याद्वारे आपण incline Crunches, Decline Crunches असे crunches चे प्रकार अगदी सहज सादर करू शकतो.

जर तुम्ही पहिल्यांदाच हा व्यायाम करत असाल, तर सुरुवात कमी वारंवारतेने करा, तसेच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोटाचा व्यायाम हा रिकाम्या पोटीच करा, कारण अन्न खाऊन पोटाचा व्यायाम केल्यास पोट दुखण्याची शक्यता असते.

कसे सादर करावे:- प्रथम पाठीच्या दिशेने जमिनीवर झोपा, आता गुडघे वर करून तुमचे दोन्ही तळपाय जमिनीवर ठेवा. तुमचे दोन्ही तळहात डोक्यामागे ठेवा आणि तुमचे डोके तुमच्या गुडघ्याच्या दिशेने घेऊन जा, हीच कृती सतत करत रहा.

2. चालणे

चालणे हा एक प्रकारचा व्यायामच आहे, हे तुम्हाला माहीत आहे का ? तसेच इतर व्यायमापेक्षा चालणे हा उत्तम व्यायाम मानला जातो, कारण हा व्यायाम कोणीही अगदी सहज सादर करू शकतो. तसेच यासाठी कोणत्याही प्रकारचे साहित्य लागत नाही. एका जागतिक रिपोर्टनुसार असे समोर आले आहे की, आपण जर दररोज किमान 10,000 पाऊले चाललो, तर आपल्या शरीराला इतर कोणत्याच व्यायामाची गरज भासत नाही. तसेच नियमित 6 ते 10 हजार पाऊले चालल्याने, आपल्याला विविध प्रकारचे फायदे होतात, जसे की वजन कमी होणे, पोटावरील चरबीचा घेरा कमी होणे, रक्तदाब सुरळीत राहणे, अन्नपचन योग्यरीत्या होणे, हृदय तंदुरुस्त राहणे इत्यादी.

आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न उद्भवतो तो म्हणजे आपण किती पावले चाललो, कसे जाणायचे कारण सतत पावले मोजत राहणे शक्य नसते, यासाठी देखील इंटरनेटवर विविध प्रकारचे Application उपलब्ध आहेत, जे मोबाईल डाऊनलोड करून त्यांना केव्हा चालू करायचे आहे ह्या app द्वारे आपण किती पाऊले चाललो आहोत हे समजते.

3. धावणे

धावणे हा एक जुना आणि प्रभावी व्यायामाचा प्रकार आहे. आपल्या फुस्फुसांची आणि शारीरिक कार्यक्षमता वाढविण्यासाठी हा उत्तम व्यायामाचा प्रकार मानला जातो. हा व्यायाम सादर करण्यासाठी आपल्याला कोणत्याही साधनांची गरज भासत नाही. धावण्याचे देखील दोन प्रकार आहेत त्यातील पहिला म्हणजे वेगाने धावणे, दुसरे म्हणजे हळूवार धावणे ज्याला आपण इंग्रजी Jogging असे म्हणतो. जर तुम्ही पहिल्यांदाच Running सुरू करत असाल, तर जॉगिंग पासून सुरुवात करावी. 

तसेच डांबरी रोडवर न धावता मैदानात धावा, कारण डांबरी रोड वर धावताना गुडघे दुखीचा त्रास उद्भवू शकतो. Running साठी पहाटेची वेळ उत्तम मानली जाते, कारण पहाटे वातावरण आणि Mind हे अगदी फ्रेश असते, तसेच आपले पोट रिकामे असल्याने धावण्याचे फायदे दुप्पट होतात.

4. रस्सी उडी ( Rope Jumping )

रस्सी उडी हा खेळ प्रत्येकाच्या ओळखीचा तर असेलच. लहानपणी प्रत्येकानेच या खेळाचा आनंद नक्कीच घेतला असेल. कालांतराने या खेळाला व्यायामाचे रूप धारण झाले आहे.

यामध्ये आपल्याला एक रस्सीच्या आधारे उड्या मारायच्या असतात. हा खेळ अथवा व्यायाम सादर करता असताना आपल्या संपूर्ण शरीराची हालचाल होत असते, ज्यामुळे जास्त Calories बर्न होतात, ज्यामुळे कमीत कमी वेळात आपण जास्त वजन कमी करू शकतो.

 दररोज किमान 50 ते 100 रस्सी उडी मारल्याने अवघ्या महिन्या भारत फरक जाणवू लागेल. या व्यायामाला Fat Burning Workout म्हणून देखील ओळखली जाते. 

5. सायकल चालवणे

सायकल चालवणे हे देखील एक उत्तम मनोरंजनाचे साधन आहे. पूर्वी सायकलचा उपयोग हा केवळ प्रवासासाठी होत होता, परंतु जसजसा सायकलचा उपयोग दैनंदिन जीवनात वाढू लागला, याचे सकारात्मक फरक आपल्या शरीरावर दिसून येऊ लागले आणि याचा उपयोग Fitness World मध्ये देखील होऊ लागला.

सायकलमुळे आपल्याला 3 फायदे होतात ते म्हणजे इंधनाची बचत होते, कमी खर्चिक आणि चांगले आरोग्य. सायकल चालवताना अधिक ताण आपल्या मांडी आणि पोटावरील चरबी वर येतो, ज्यामुळे पोटावरील चरबी कमी होण्यास मदत मिळते. सायकल चालवण्यासाठी वेळेचे बंधन नसल्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार कधीही सायकल चालवू शकता. 

6. Plank

Plank हा देखील पोटाची चरबी कमी करण्यासाठी एक ठराविक व्यायामाचा प्रकार आहे. Plank व्यायामाचा एक प्रकार देखील आहे, ज्याला Site Plank असे म्हणतात. हा plank चा प्रकार आपण कोणत्याही सामग्री शिवाय अगदी कमी जागेत सादर करू शकतो. 

Plank म्हणजे मुळात एक शारीरिक स्थिती आहे, ज्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त वेळ राहण्याचा प्रयत्न करायचा असतो. Plank स्थितीत जॉर्ज नामक व्यक्तीने 8 तास 15 मिनिटे आणि 15 सेकंद स्थिर राहण्याचा वर्ल्ड World Record स्वतःची नावी पटकावला आहे.

सादर कसे करावे:- ज्याप्रमाणे आपण Push up मारतो, प्रथम ती स्थिती धारण करायची, आता कोपऱ्यापासून हात जमिनीवर ठेवा आणि आता अशाच स्थितीत स्थिर रहा.

7. भुजंगासन

भुजंगासन हा मुळातच एक आसन आहे. भुजंग म्हणजे साप आणि भुजंगासन म्हणजे सापाची स्थिती. जेव्हा नाग स्वसंरक्षणासाठी, ज्याप्रमाणे फणा काढून डोलतो, अगदी तशीच स्थिती आपल्याला आपल्या शरीराची बनवायची आहे. हे आसन सादर करताना संपूर्ण ताण आपल्या पोटावर येतो, ज्यामुळे पोटावरील चरबी कमी होते सोबतच पचनशक्ती देखील चांगली होते असे म्हटले जाते.

सादर कसे करावे:- प्रथम पोटाच्या दिशेने जमिनीवर झोपा. पाय सरळ ठेवा. तुमचे दोन्ही तळहात जमिनीवर ठेवून हात सरळ करा आणि डोके वर करून मागच्या दिशेला नेहण्याचा प्रयत्न करा.

8. सूर्यनमस्कार

सूर्यनमस्कार बद्दल तर नक्कीच सर्वांना माहीत असेल. हा एक जुना व्यायामाचा प्रकार असून संपूर्ण शरीरासाठी हा फार उत्तम मानला जातो. या व्यायामाचा प्रभाव संपूर्ण शरीरावर होत असल्याने, न केवळ पोटावरील तर संपूर्ण शरीरावरील चरबी कमी होण्यास मदत मिळते. दोन महिने हा व्यायाम सतत केल्याने वजन कमी होते, शरीराला योग्य आकार येणे असे अनेक फायदे होऊ लागतात. अगदी कमी जागेत आणि कोणत्याही साहित्या शिवाय आपण हा व्यायाम पार पाडू शकतो.

9. Mountain Climber

Mountain climber चा मराठीत अर्थ डोंगर चढणारा असा होतो. या व्यायामाला Running Plank नावाने देखील ओळखले जाते. आपण ज्या शारीरिक अवस्तेथ डोंगर चढतो, ह्या व्यायामामध्ये देखील अगदी तीच कृती करायची असते, परंतु थोड्या वेगळ्या पद्धतीने. प्रथम push up च्या स्थितीमध्ये या. आता एक गुडघा तुमच्या छातीला स्पर्श करून मागे घ्या, पुण्य दुसर्‍या बाजूचा गुडघ्याने छातीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा आणि हीच कृती सतत चालू राहू द्या. काही वेळाने पायांचा वेग वाढवा ही कृती करताना आपले संपूर्ण शरीर सहभागी होते, ज्यामुळे आपल्याला लगेच दम लागतो. हा व्यायाम तुम्ही कोणत्याही ठिकाणी अगदी सहज पार पाडू शकता. शरीरात चपळता आणण्यासाठी हा व्यायाम एक उत्तम पर्याय आहे, तसेच plank position मध्ये अधिक काळ राहण्याची आपली क्षमता देखील वाढते.

9. पोहणे

कदाचितच असा व्यक्ती असेल, ज्याला पोहणे आवडत नसेल. पोहने हा केवळ मनोरंजनासाठीच नव्हे, तर शारीरिक तंदुरुस्तीच्या हेतूने देखील उत्तम पर्याय आहे. पोट कमी करण्यासाठी अथवा तंदुरुस्त राहण्यासाठी बरेचसे लोक जिम साठी पैसे खर्च करतात तसेच अनेकदा gym मध्ये व्यायामादरम्यान गंभीर दुखापती देखील होतात, परंतु पोहणे हा इतर व्यायमंपेक्षा सुरक्षित आणि परिणामकारक व्यायाम आहे.

पोहताना आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव सहभागी होतो, दुखापत होण्याची शक्यता देखील फार कमी असते. तसेच शरीराचा स्टॅमिना देखील दुप्पट होतो. पोहताना आपले एकच ध्येय असते, ते म्हणजे मनोरंजन ज्यामुळे आपण कितीही पोहलो, तरी आपल्याला थकवा जाणवत नाही आणि कमी वेळात जास्त कॅलरीज देखील बर्न होतात.

10. नौकासन

नौकासना देखील एक योगमधील आसनाचा प्रकार असून या आसनामध्ये आपल्याला आपले शरीर एखाद्या तरंगत्या नावेप्रमाने करायचे असते, म्हणूनच याला नौकासन असे म्हणतात. नौकासन सादर करणे सोपे आहे, परंतु नौकासनाच्या स्थितीमध्ये अधिक काळ राहणे फार कठीण असते, यासाठी ताकतीची गरज असते. या आसनामुळे पोट, मेरुदंड आणि पायाच्या स्नायूंवर ताण येऊन तेथील चरबी कमी होण्यास मदत मिळते.

सादर कसे करावे:- प्रथम पाठीच्या दिशेने जमिनीवर झोपावे. आता कबरे खालील, कमरेवरील भाग आणि दोन्ही पाय थोड्या अंतरावर उचलून हवेत ठेवावेत, जमेल तितका वेळा ह्याच शारीरिक स्थितीत राहण्याचा प्रयत्न करावा


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट