वैशिष्ट्यीकृत

ग्रीन टी चे फायदे | Benefits of Green tea in Marathi

ग्रीन टी हे जगातील पोषक पेयांपैकी एक आहे, ज्यामध्ये विविध पोषक तत्वांचा समावेश असतो. ग्रीन टी मधील पोषक्तात्वांमुळे आपल्या शरीराला दैनंदिन जीवनात खूप फायदे होत असतात.

या लेखात आपण ग्रीन टी म्हणजे काय, ग्रीन टी चे फायदे, ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ अशा विविध घटकांची माहिती पाहणार आहोत.

ग्रीन टी म्हणजे काय ?

Camellia sinensis नावाच्या झाडाच्या पानांपासून आणि कळ्यांपासून ग्रीन टी चे उत्पादन घेतले जाते.

ग्रीन टी हा चहाचा एक प्रकार असला तरी, इतर चहा बनविण्यासाठी ज्या प्रमाणे ऑक्सिडेशन ची प्रक्रिया पार पाडावी लागते, तशी प्रक्रिया ग्रीन टी तयार करण्यासाठी पार पाडावी लागत नाही. ग्रीन टी ची उत्पत्ती ही जगात सर्वप्रथम चीन या देशात झाली असून, चीन हा जगातील ग्रीन टी चा सर्वाधिक उत्पादन घेणारा देश आहे. कालांतराने ग्रीन टी चे प्रसारण संपूर्ण जगात झाले असल्यामुळे, जगात जवळ जवळ सर्वाच देशांमध्ये ग्रीन टी चे उत्पादन घेतले जात आहे. ग्रीन टी चे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या देशांच्या यादीत भारताचे नाव देखील सामील आहे.

ग्रीन टी चे फायदे ( Benefits Of Green tea in Marathi )

1. कॅन्सर पासून बचाव होतो

कॅन्सर हा मुळात एक जीवघेणा रोग आहे, या रोगामुळे आपल्या शरीरातील पेशी काम करणे बंद करतात. कॅन्सरचा प्रभाव सुरुवातीला अगदी काही पेशीपर्यंतच मर्यादित असतो, परंतु अगदी वेगाने हा रोग शरीरात इतर पेशीपर्यंत पसरतो व त्यांना कॅन्सर ग्रस्त करतो, ज्यामुळे कॅन्सरचा प्रभाव वाढत जातो. शेवटी अशी वेळ येते, जेव्हा कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरते आणि मानवी शरीर कार्य करणे बंद करते, ज्यामुळे माणसाचा मृत्यू होतो.

कॅन्सर वर अद्यापही औषध तयार झाले नाही, अशा कॅन्सर पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपण ग्रीन टी ची सहाय्यता घेऊ शकतो. ग्रीन टीमध्ये असे काही गुणधर्म असतात जे शरीरात अनुपयोगी आणि घातक पेशींची वाढ रोखून त्यांचा विरोध दर्शवत, यामुळे कॅन्सरसारख्या रोगापासून आपला बचाव होतो.

2. वजन कमी होणे

हल्ली वजन वाढणे हा त्रास बहुतेक लोकांना सतावत असतो आणि लठ्ठपणाला ग्रस्त असणाऱ्या लोकांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे, याची अनेक कारणे आहेत. परंतु जास्त खाणे, व्यायाम न करणे, योग्य आणि पौष्टिक आहार न घेणे ही काही प्रमुख कारणे आहेत. वजन कमी होणे अथवा करणे ही एक जास्त वेळ घेणारी प्रक्रिया अगदी लवकर वजन कमी करण्यासाठी लोक विविध प्रकारचे Fat Burner घेतात.

 वजन कमी करण्यासाठी एक नैसर्गिक आणि कमी खर्चिक उपाय म्हणजे ग्रीन टी होय. ग्रीन टी ला सुपरफुड म्हणून देखील ओळखली जाते. नियमित ग्रीन टी पिल्याने शरीरातील फॅट बर्न प्रक्रियेला चालना मिळते, ज्यामुळे शरीरात असलेले fat सेल्स ब्रेक होताt आणि वजन कमी होण्याच्या प्रक्रियेला चालना मिळते.

3. मधुमेहाच्या दुसऱ्या प्रकारापासून बचाव होतो.

पूर्वीपेक्षा सध्याच्या काळात मधुमेह हया आजाराने ग्रस्त असणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढत देखील आहे. ह्या आजारात आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त वाढते.

आपल्या शरीरातील Insulin नामक एक घटक असतो, जो carbohydrate ला एनर्जी रूपात कन्वर्ट करतो आणि ही एनर्जी शरीराला विविध प्रकारच्या हालचाली करण्यास मदत करते.

जेव्हा आपण कोणतेही अन्न खातो, तेव्हा पचनानंतर त्या अन्नातील कार्बोहायड्रेट्स शरीराला मिळतात, ज्यांचे नंतर रूपांतर ग्लुकोजमध्ये होते आणि या ग्लुकोजचे इन्सुलिन मुळे एनर्जी मध्ये रुपांतर होते, अशात काही कारणास्तव जर इन्सुलिन योग्य काम करणे सोडून देतो, तेव्हा रक्तातील ग्लुकोज म्हणजे साखरेचे प्रमाण वाढते आणि व्यक्ती मधुमेह या रोगाने ग्रस्त होतो नियमित ग्रीन टी चे सेवन केल्याने इन्सुलिन हा घटक योग्य रित्या काम करू लागतो, यामुळे मधुमेह होत नाही किंवा ब्लड शुगर नियंत्रित राहते.

4. रक्तदाबाचा त्रास उद्भवत नाही

रक्तदाब म्हणजे शरीरातील धमन्यांमध्ये वाहणाऱ्या रक्ताचा दाब किंवा वेग होय. जेव्हा आपल्या धमन्यांमधील वाहणाऱ्या रक्ताचा वेग कमी-जास्त होतो, तेव्हा आपण रक्तदाबाचा त्रास उद्भवला असे म्हणतो. जेव्हा रक्तदाब वाढतो तेव्हा त्याला High Blood pressure आणि जेव्हा रक्तदाब कमी होतो त्याला Low Blood Pressure असे म्हणतात.

संपूर्ण जगात Low Blood Pressure पेक्षा High Blood pressure च्या त्रासाने लोक जास्त ग्रस्त आहेत. अनेकदा रक्तदाबाचा त्रासामुळे हृदयविकाराचे झटके देखील येतात, ज्यात व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो.

नियमित ग्रीन टी पिल्याने रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण म्हणजेच हिमोग्लोबिन संतुलित राहण्यास मदत होते, त्यामुळे रक्तदाबाचा त्रास उद्भवण्याची शक्यता फार कमी होऊन जाते

5. त्वचा सुंदर व निरोगी राहते

हल्ली लोक स्वतःच्या त्वचेला घेऊन फार संवेदनशील झाले आहेत. म्हणजे त्वचा उजळ करण्यासाठी विविध क्रीम साबण औषधे वापरू लागले आहेत, परंतु या औषधांचा परिणाम अनेकदा होत नाही, कारण प्रत्येकाची त्वचा ही सारखी नसते.

तसेच अनेकांना विविध त्वचारोग यांना देखील सामोरे जावे लागते, त्यामुळे त्वचा कमजोर होऊ लागते व त्वचेचा ग्लो देखील कमी होतो, याचे मुख्य कारण म्हणजे त्वचेचे डीहायड्रेशन आणि त्वचेला मिळणारे अपुरे पोषण.

त्वचेला ग्लो करण्यासाठी आणि हायड्रेट ठेवण्यासाठी एक नैसर्गिक मार्ग म्हणजे ग्रीन टी. ग्रीन टी च्या पोषणात एकूण 90 टक्के पेक्षा अधिक पाणी असते,  सोबतच अनेक एंटीऑक्सीडेंट देखील असतात, ज्यामुळे त्वचा Hydrate राहते आणि सोबतच निरोगी आणि ग्लो देखील करू लागते.

6. पचनक्रिया सुरळीत होते

पचन क्रिया ही आपल्या शरीरातील सर्वात मोठ्या प्रक्रियापैकी एक आहे. जेव्हा आपण झोपतो म्हणजेच जेव्हा आपले शरीर निद्रेत असते, तेव्हा देखील पचनक्रिया कार्यशील असते.

जेव्हा आपण तोंडात अन्नाचा घास घेतो, तेव्हाच ही प्रक्रिया सुरू होते, म्हणजेच दातांद्द्वारे अन्न बारीक चावले जाते, त्यानंतर हे अन्ननलिकेचे मार्फत पोटात जाते. पोटातील acidic गुणधर्मामुळे अन्नाचे पूर्णता विघटन होते आणि अन्नातून  मिळणारे पोषण संपूर्ण शरीरात पोहोचवले जाते, ज्यामुळे आपले शरीर कार्यरत राहते. जर आपली पचनक्रिया बिघडली असेल तर अन्नाचे पचन योग्यरित्या होत नाही, ज्यामुळे शरीराला योग्य पोषण मिळत नाही. तसेच विविध शारीरिक त्रासांना देखील सामोरे जावे लागते. अशात ग्रीन टी आपल्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते, जेव्हा आपण गरम ग्रीन टी पितो तेव्हा पोटातील अन्नाचे विघटन वेगाने होऊ लागते, ज्यामुळे अन्न पचन क्रियेला अन्नपचन करण्यास कमी मेहनत घ्यावी लागते आणि हळुहळु आपली पचन क्रिया सुधारली जाते

7. मेंदूची कार्यक्षमता वाढते

मेंदू हा आपल्या संपूर्ण शरीरात नियंत्रक असतो. नियमित ग्रीन टी पिल्याने मेंदूची कार्यप्रणाली आणखी उत्तम होते, असे अनेक प्रयोगांमधून समोर आले आहे.

ग्रीन टी मध्ये stimulant म्हणजेच कॅफिन नावाचा एक घटक असतो, जो मेंदूसाठी उत्तम मानला जातो. ग्रीन टी मध्ये कॉफी इतके कॅफिन तर नसते, तरी शरीराला फायदा होईल इतक्या प्रमाणात तर कॅफिन नक्कीच असते.

अनेक संशोधनात असे देखील समोर आले आहे, की कॅफिन मुळे न केवळ मेंदूची कार्यप्रणाली उत्तम होते, तर आपला मूड फ्रेश आणि चांगला राहतो. कोणत्याही घटनेवर अथवा कृतीवर प्रक्रिया देण्याचा मेंदूचा वेग वाढतो.

ग्रीन टी मध्ये मेंदूला फायदा देणारा कॅफिन हा एकुलता एक घटक नसून, यामध्ये l-theamine देखील आढळते, जे मेंदूला योग्य प्रमाणात रक्तपुरवठा करण्यास मदत करते.

ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ कोणती ?

सकाळी उपाशी पोटी ग्रीन टी पिल्याने पोट साफ होणे, आळस दूर होणे आणि वजन कमी होणे असे फायदे होतात.

व्यायाम करत असताना आपल्या संपूर्ण शरीराची हालचाल अधिक होते, सोबतच दम देखील लागतो, अशाt जर व्यायाम सुरू करण्यापूर्वीच ग्रीन टी पिली, तर व्यायामा दरम्यान आपला परफॉर्मन्स अधिक चांगला होतो, तसेच दम देखील कमी लागतो.

प्रत्येक सामान्य व्यक्ती दिवसातून दोन ते तीन कप दुधाचा चहा पितो, या चहा मध्ये साखर असल्याने हा चहा फार नव्हे, तर काही प्रमाणात वजन वाढण्यास कारणीभूत ठरतो, म्हणून जेव्हाही तुमची चहा पिण्याची वेळ असेल, तेव्हा दुधाच्या चहा ऐवजी ग्रीन टी पिण्यास सुरुवात करा, कारण नॉर्मल चहापेक्षा ग्रीन टी शरीराला अधिक फायदे देते.

ग्रीन टी कशी बनवावी ?

बाजारात दोन विविध प्रकारच्या ग्रीन टी उपलब्ध असतात, पहिली म्हणजे सुट्टी ग्रीन टी आणि दुसरी म्हणजे टी बॅग वाली ग्रीन टी.

1. टी बॅग वाली ग्रीन टी

टी बॅग वाली ग्रीन टी तयार करण्यासाठी प्रथम एक कप गरम पाणी करा आणि नंतर त्यामध्ये टी बॅक दोन मिनिटे ठेवा अशाप्रकारे तुमची ग्रीन टी तयार होईल.

2. सुट्टी ग्रीन टी

प्रथम एक भांड घ्या, त्यामध्ये एक कप पाणी घ्या. पाणी गरम होऊ द्या. जेव्हा पाणी उकळू लागेल, तेव्हा फक्त थोडी ग्रीन टी भांड्यात ॲड करा, जेव्हा ग्रीन टी चा हिरवा रंग पाण्यात उतरेल तेव्हा ते पाणी गाळून घ्या आणि अशाप्रकारे तुमची ग्रीन ती तयार होईल.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट